आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस इंडिया नवनीतला चित्रपटात रस नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- गेल्या काही वर्षांत भारतीय सुंदरींना मिस युनिव्हर्स व मिस वर्ल्डच्या पुरस्काराने हुलकावणी दिली आहे. यावर्षीची मिस इंडिया नवनीत कौर धिल्लोन हीने चित्रपटाऐवजी मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्डचा मुकुट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

पंजाब विद्यापीठातील पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याला माझे पहिले प्राधान्य आहे. काही वेळा तुम्हाला मिळालेले यश अस्थायी स्वरूपाचे असते. करिअरमधील यश दीर्घकाळ टिकणारे असते, असे नवनीत म्हणाली. प्रसारमाध्यमाशी संबंधित कोर्स करताना तुम्ही चित्रपट जगतापासून फार दूर राहत नाहीत. मीडिया आणि चित्रपटसृष्टीतील अंतर दूर करेन. मात्र, त्याबाबतचा निर्णय मिस युनिव्हर्स स्पध्रेनंतरच घेईन, असे तिने सांगितले. मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर सौंदर्यवती चित्रपटसृष्टीकडे लगेच वळतात