(डान्स परफॉर्मन्स देताना गोहर खान)
मुंबईः यो यो
हनी सिंगचा टीव्ही रिअॅलिटी शो 'इंडियाज रॉ स्टार' आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शुक्रवारी या शोच्या ग्रॅण्ड फिनाले एपिसोड शूट करण्यात आला. यावेळी मोहित गौरने परफॉर्म केले. तर गायक शान परीक्षकाच्या भूमिकेत होता.
फिनालेत मोहितने रॉक परफॉर्मन्स दिले. शिवाय शानसोबत एका मंचावरसुद्धा आला. शानने मोहितसोबत गाणेही गायले. या शोची होस्ट गोहर खानचाही धमाकेदार परफॉर्मन्स फिनालेचे आकर्षणबिंदू ठरला. यावेळी गोहर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.
'इंडियाज रॉ स्टार'च्या ग्रॅण्ड फिनालेत मोहित गौरसोबत दर्शन रावल आणि ऋतुराज मोहंती पोहोचले आहेत. मोहित जयपूर, दर्शन अहमदाबाद आणि ऋतुराज पुरी (उडीसा)मधील आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ग्रॅण्ड फिनालेची छायाचित्रे...