(अभिनेत्री मोनी वासूचे दोन छायाचित्रे)
मुंबई: छोट्या पडद्यावर अभिनयाच्या जगात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मोना वासु
आज 32वा वाढदिवस साजरा करत आहे. 15 ऑक्टोबर 1982 रोजी केरळमध्ये जन्म तिचा जन्म झाला. तिने मालिका आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. काही छोट्या-मोठ्या भूमिका
साकारून ती रुपेरी पडद्यावरसुध्दा झळकली आहे. मात्र, तिला येथे यश मिळाले नाही.
मोनाला इंडस्ट्रीमध्ये खरी ओळख छोट्या पडद्यावरच मिळाली. 2003मध्ये नवीन दिल्लीच्या श्री व्यंकटेश्वर कॉलजमधून सोसियॉलॉजीमधून पदवी घेतली. त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्राकडे कल असल्याने ती मुंबईला रवाना झाली. तिथे तिने नशीब आजमावण्यास सुरुवात केली. मोना सुंदर असल्याने तिला मोठ्या ब्रँडच्या जाहिराती मिळू लागल्या. त्यानंतर तिला स्टार गोल्डवर वीकली ट्रॅव्हल शो 'ऑपरेशन गोल्ड'मध्ये काम मिळाले. अशाप्रकारे मोनाच्या अभिनय करिअरला सुरुवात झाली. 2004मध्ये तिने टेलि फिल्मी '30 डे ट्रायल'मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. या मालिकेसाठी तिला इंडियअन टेली अवॉर्ड्ससुध्दा मिळाले. या यशाने मोनासाठी पुढचे मार्ग खुले झाले. 'शुsssss....कोई है', 'राधा की बेटिया कुछ कर दिखायेगी', 'स्पेशल@10', 'हम-एक छोटे गाव की बडी कहानी', 'परिचय-नई जिंदगी के सपनो का'मध्ये तिने अभिनय केला. यावर्षी
अमिताभ बच्चन यांच्या 'युध्द' मालिकेतसुध्दा मोना दिसली होती.
टीव्ही शोने दिले यश-
मलेशियाच्या भयावह जंगलात शूट करण्यात आलेल्या 'इस जंगल से मुझे बचाओ' शोने मोनाला मोठी प्रसिध्दी मिळाली. तिने या शोसाठी किताब
आपल्या नावी केला. तिला 'जंगल क्वीन'सह एक कोटींचे बक्षीस मिळाले होते. या शोमध्ये तिने बिकीनी परिधान करून अंघोळ केल्याने वाद निर्माण झाला होता. मोना 'माजी' आणि 'क्लब 60' या बॉलिवूड सिनेमांत दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मोना वासुची निवडक छायाचित्रे...