आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss: मोनालिसाने गौरवबरोबर केली बाथटबमध्ये मस्ती, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोनालिसा आणि गौरव चोप्रा. - Divya Marathi
मोनालिसा आणि गौरव चोप्रा.
मुंबई - मनु पंजाबीनंतर आता मोनालिसाची गौरव चोप्राबरोबर जवळीक वाढली आहे. सोमवारी गौरव आणि मोनालिसा यांच्यातील चर्चेत गौरव मोनालिसाला हे म्हणताना आढळला की, घरातील इतर कोणीही त्याच्याशी बोलत नाही. एवढेच नाही तर, एपिसोडच्या शेवटी मंगळवारी प्रिकॅपमध्ये मोना आणि गौरव हे दोघे बाथटबमध्ये मस्ती करत असल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व टास्कसाठी सुरू असले तरी त्या दोघांचे हावभाव मात्र वेगळीच गोष्ट सांगत आहेत. पण मोना आणि गौरव खरंच अफेयरमध्ये आहेत की, हा सर्व ड्रामा सुरू आहे हे पाहावे लागणार आहे.
मनुने पाहिली मोना आणि गौरवची मस्ती..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

आईच्या निधनानंतर घराबाहेर गेलेला मनु परतला आहे. मात्र त्यासा सिक्रेट रूममध्ये थांबवण्यात आले आहे. तो त्याठिकाणाहून लाइव्ह कॅमेऱ्यांच्या मदतीने घरातील संपूर्ण सदस्यांचे फुटेज पाहत आहेत. त्याने मोना आणि गौरवची मस्तीदेखिल पाहिली. त्यामुळे आता मनु जेव्हा मुख्य घरात प्रवेश करेल त्यावेळी मोनाची रिअॅक्शन कशी असेल हे पाहणे मजेशीर असेल. मनु बाहेर जाईपर्यंत मोना आणि तो एकमेकांच्या पार जवळ होते. मनु लवकरच परतणार असल्याचे मात्र मोनाला अद्याप माहिती नाही.

मनवीर आणि नितिभाबाबतही चर्चा..
'बिग बॉस'च्या घरातील आणखी एका जोडप्याची सध्या आत आणि बाहेरही जोरदार चर्चा सुरू आहे. ही जोडी म्हणजे कॉमनर मनवीर गुर्जर आणि नितिभा कौल यांची. दोघांची इंटीमसी आता स्पष्टपणे दिसायला लागली आहे. काही दिवसांपूर्वी दोघे सोबतच झोपत असल्याचेही पाहायला मिळाले होते. एवढेच नाही तर, मोनालिसाने दोगांना भैय्या आणि भाबी म्हणत चिडवणेही सुरू केले आहे. नितिभाने मात्र वारंवार आपण केवळ मित्र असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मनु बाहेर गेल्यानंतर नितिभा आणि मनवीर यांची मैत्री वाढली होती. बानी आणि गौरवही दोघांबाबत बोलत असल्याचे पाहायला मिळाले होते.

पुढील स्लाइड्सवर Photos मधून पाहा, गौरव-मोनाची बाथटबमधील मस्ती आणि मनवीर-नितिभा यांचे कँडीड मोमेंट्स..
बातम्या आणखी आहेत...