आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांची झाली TV ची ही ग्लॅमरस 'नागिन', BF आणि मित्रांसोबत सेलिब्रेट केला B'day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्हीवर 'नागिन' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मोनी रॉय हिचा वाढदिवस असून तिने वयाची 31 वर्षांची झाली आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री मोनीने तिच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. मोनीचा बॉयफ्रेंड मोहित रैनासह अंकिता लोखंडे, पुनीत पाठक, श्वेता रोहिरा, आदिती गुप्ता, पूजा बॅनर्जी, संजीदा शेख आणि करणवीर बोहरा मोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले. 'नागिन' या मालिकेतील तिचा को-स्टार अर्जुन बिजलानी आणि अदा खानसुद्धा पार्टी पोहोचले होते.

'देवों के देव महादेव' मालिकेतून झाली पॉप्युलर...
28 सप्टेंबर 1985 रोजी कोच बिहार (पश्चिम बंगाल) मध्ये जन्मलेल्या मोनीने 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कस्तूरी' आणि 'पति पत्नी और वो' या मालिकांमध्ये काम केले. तर तिला खरी ओळख 'देवों के देव महादेव' या मालिकेतील सतीच्या भूमिकेतून मिळाली. याच मालिकेत महादेवाची भूमिका साकारणा-या अभिनेता मोहित रैनासोबत मोनी आता रिलेशनशिपमध्ये आहे. अद्याप दोघांनी आपले नाते सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही. मोनी लवकरच 'नागिन' या मालिकेच्या दुस-या पर्वातून छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मोनी रॉयच्या बर्थडे बॅशचे PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...