आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Munmun Dutta Was Beaten By Armaan Kohli In The Past

एकेकाळी अरमान कोहलीसोबत होते 'बबिताजी'चे संबंध, नेहमी व्हायची तिला मारहाण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता भलेही सध्या सिंगल असली तरी एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.
नक्की काय झाले होते?
व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी अरमानने काहीतरी कारणावरुन मुनमुन दत्ताला मारहाण केली होती. यानंतर मुनमुनने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. आपल्या वर्तणुकीमुळे अरमानला त्यावेळी दंडही भरावा लागला होता. अरमानशी ब्रेकअप झाल्यानंतर बबिता आतापर्यंत सिंगल आहे. लग्न करण्यात सध्या तरी तिला रस नाही. तिला संपूर्ण जग फिरायचे आहे. तसेच चित्रपटात काम करण्याचीही तिची इच्छा आहे.

डॉली बिंद्राने पाहिले होते मुनमुनला रडताना...
डॉली बिंद्राने मुनमुन आणि अरमानमध्ये झालेल्या भांडणाची साक्षीदार होती. तिने दिलेल्या माहितीनुसार, अरमानची मुनमुनसोबतची वागणूक कधीच नॉर्मल नव्हती. जेव्हा दोघेजण मॉरिशसला सुटीसाठी गेले होते, तेथेदेखील अरमानने तिला मारहाण केली होती. मुनमुनला एकदा डॉली बिंद्राने घरातून रडत बाहेर पडताना पाहिले होते. इतकेच नाही तर डॉली आणि तिचा नवरा कैजाद यांनी दोघांमधील वाद मिटवण्याचाही प्रयत्न केला होता.
ब्रेकअपनंतर सिंगल आहे मुनमुन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरमानसोबत ब्रेकअप झाल्यापासून मुनमुन सिंगल आहे. शिवाय तिच्यापासून विभक्त झाल्यानंतर अरमानचा स्वभाव आणखीच चिडका झाल्याचे म्हटले जाते. मुनमुनपासून विभक्त झाल्यानंतर अरमानचे नाव तान्या सिंह आणि तनिषा मुखर्जीसोबत जुळले होते.
जेठालालने दिला होता रोल
'तारक मेहता...'मध्ये मुनमुनला बबिताची भूमिका शोमधील प्रमुख जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी मिळवून दिली होती. या दोघांनी आधी 'हम सब बाराती'मध्ये काम केले होते. त्यामुळे तारक मेहतासाठी कास्टिंग सुरु होती तेव्हा मुनमुनचे नाव दिलीप जोशींनी सुचवले होते. मुनमुन आणि दिलीप जोशी या मालिकेपूर्वी 'हम सब बाराती' मालिकेत झळकले होते.

वाद आणि नखरे
>> मुनमुनशी एक वाद जोडलेला आहे. सांगितले जाते, की तिला फिजीकल टच आवडत नाही. शूटिंगदरम्यान जर फिजिकल टचचा एखादा शॉट आला, की चिडते. तिच्या या सवयीने दिग्दर्शकांनी तिला अनेक एपिसोडमधून आउट केले आहे. तरीदेखील मुनमुन तिच्या या अटीवर ठाम आहे.
>> तारक मेहता... या मालिकेत कृष्णन अय्यर (तनुज महाशब्दे) च्या पत्नीच्या भूमिकेत मुनमुन दिसत आहे. मात्र कृष्णनचा रंग सावळा आणि तिच्या रंग गोरा असल्याने सुरुवातीला तिचा ही भूमिका करण्यावर आक्षेप होता. मध्यंतरी दोघांमध्ये वाद झाल्याचाही बातम्या प्रसिद्धीत होत्या.
>> या मालिकेत एक शॉट होळीचा होता. सर्व कलाकार एकमेकांना रंग लावणार होते. मात्र मुनमुनने या शॉटसाठी नखरे दाखवले असे सांगितले जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुनमुन दत्ताची निवडक छायाचित्रे...