आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muskaan Arora Has Accused Ex Boyfriend On Mentally Harassing Her

टीव्ही अभिनेत्रीने माजी बॉयफ्रेंडवर लावला आरोप, म्हणाली, 'माझ्या मैत्रीणींसह व्हायचा इंटीमेट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: मुस्कान अरोरा)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री मुस्कान अरोराने (मुस्कान नेंसी जेम्स) माजी बॉयफ्रेंड मनीष नागदेववर फसवणूक आणि मनासिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. मुस्कान आणि मनीष मागील एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि दोन महिन्यापूर्वी त्यांचे ब्रेक-अप झाले.
याविषयी सांगताना मुस्कान म्हणते, 'मनीष आणि मी जवळपास एक वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. मी 'महाराणा प्रताप'च्या शूटिंगसाठी रोज चार तासांचा मुंबईचा प्रवास करून जात होते. त्यादरम्यान मनीष माझ्या इतर मैत्रीणींसह इंटीमेट होताना मला जाणवले. तो आस्था चौधरीला डेट करत होता आणि माझ्याशी खोटे बोलत होता. मी एकदा त्यांना रंगेहात पडकले होते. त्यावेळी त्यांनी चुकी झाली म्हणून माफी मागितली होती. त्यांना मी शेवटची संधी दिली होती. काही दिवसांपुर्वी मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी मला कळाले, की मनीष सृष्टी रोडेला डेट करत आहे. मला धक्काच बसला आणि मी ताबडतोब सृष्टीला फोन केला. मात्र तिने माझे म्हणणे फेटाळून लावले. मी तिच्यावर विश्वास ठेवला. पण काही दिवसांत तिने तिच्या नात्याचे स्पष्टीकरण दिले. मी आता मनीषच्या विरोधात कायदेशिरित्या तक्रार दाखल करण्याची तयारी करत आहे. कारण त्याने गुंतवणूकिसाठी माझ्या आईकडून पैसे घेतले होते आणि त्याने ते अद्याप परत केलेले नाहीत.'
सध्या मनीष अभिनेत्री सृष्टी रोडेसह डेटींग करत आहे. याविषयी आम्ही सृष्टीशी बातचीत केली त्यावर ती म्हणाली, 'मी मनीष नागदेवसह डेटींग करत आहे. मुस्कान अरोरा कोण आहे हे मला ठाऊक नाही. तिने माझ्यावर आणि मनीषवर असे आरोप का लावले याविषयी मी अज्ञात आहे. याविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही. मला मनीषवर विश्वास आहे आणि तो माझ्यासाठी एक चांगली व्यक्ती आहे.' याविषयी आम्ही मनीषचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याशी बातचीत होऊ शकली नाही.
कोण आहे मुस्कान अरोरा?
मुस्कान अरोरा एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने सहारा चॅनलवर प्रसारित होणा-या 'माता की चौकी'मध्ये साक्षीचे पात्र साकारले होते. ती काही काळ सोनी चॅनलच्या लोकप्रिय 'भारत का वीर पुत्र: महाराणा प्रताप' या मालिकेतसुध्दा दिसली आहे.
कोण आहे मनीषा नागदेव?
मनीष नागदेव सध्या झीटीव्हीच्या 'पवित्र रिश्ता'मध्ये शशांक कांबळेचे पात्र साकारत आहे. 'बनू मै तेरी दुल्हन' (2007-2009), 'हम लडकिया' (2008-2009), 'रहना है तेरी पलको की छाव मे' (2009-10) आणि 'मधुबाला: एक इश्क एक जुनून' (2013)सारख्या मालिकांमध्येसुध्दा दिसला आहे.
कोण आहे सृष्टी रोडे?
सृष्टी सध्या स्टार प्लसवरील 'सरस्वतीचंद्र' मालिकेत अनुष्काचे पात्र साकारत आहे. 'ये इश्क हाय' (2010-2011), 'छोटी बहू' सीजन-2(2011-2012) आणि 'शोभा सोमनाथ की' (2011-2012)सारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुस्कान अरोराची खास छायाचित्रे...