फाइल फोटो: कपिल शर्मा
मुंबई: कुणाला हसवणे किती कठिण असते हे कपिल शर्माशिवाय कुणाला चांगले ठाऊक असेल. आज तो ज्या शिखारावर आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती कष्ट घ्यावे लागले याची जाणीव कदाचितच कुणाला असेल. आठ रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेऊन प्रत्येक शोमध्ये आपली एक वेगळी छाप सोडल्यानंतर त्याने स्वत: 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा कॉमेडी शो सुरू केला. या शोच्या माध्यमातून त्याने कोट्यावधी प्रेक्षकांचे मन त्याने जिंकले आहे. अलीकडेच, divyamarathi.comने कपिल शर्मासोबत बातचीत केली आणि त्याच्या सर्व जीवनप्रावासविषयी माहिती मिळवली. सोबतच, त्याच्या लग्नाच्या प्लॅनविषयीसुध्दा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चला जाणून घेऊया मुलाखतीदरम्यान कपिल काय-काय म्हणाला?
तू केव्हा लग्न करणार आहेस आणि कशी लाइफ पार्टनर हवी आहे?
(दिर्घ श्वास घेऊन) मी 2025मध्ये लग्न करणार आहे. खरे सांगायचे झाले तर मी लग्नाविषयी कधी विचारही केला नव्हता. जेव्हा मी माझ्या करिअरने समाधानी झाल्यानंतर लग्न करणार आहे. लाइफ पार्टनरविषयी सांगायचे झाले तर, खूप साधे आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवाणारी मुलगी मला हवीये. ती दिसायला सुंदर हवी.
'कॉमेडी नाइट्स...'ने यशस्वीरित्या एक वर्षे पूर्ण केले आहे. यादरम्यान तुझा अनुभव कसा होता?
आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. प्रत्येक विनोदवीराचे स्वप्न असते, की त्याचा स्वत:चा एक शो असावा, तसेच माझेही होते. मला ठाऊक होते, की शो बनवणे सोपे नाहीये, तरीदेखील मी रिस्क घेतली. आता शोच्या माध्यमातून लाखो लोकांचे मनोरंजन होताना पाहून मला खूप आनंद होत आहे. कारण कॉमेडी करणे खूप कठिण आहे. शोला खूप लोकप्रियता मिळाली आहे. आणि नॉन फिक्शन शोच्या श्रेणीमध्ये टॉपवर आहे. मी लोकांना हसवून खूप आनंदी आहे.
'कॉमेडी नाइट्स...' डबाबंद होणार आहे?
कृपया माफ करा, परंतु याविषयी काहीही सांगू शकत नाही. नो कमेन्ट...!
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा मुलाखतीचे काही अंश...