आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस कंटेस्टंटसोबत होते मौनी रॉयचे अफेअर, आता \'महादेवा\'ची होणार अर्धांगिनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L) बॉयफ्रेंड मोहित रैना आणि एक्स बॉयफ्रेंड गौरव चोपडासोबत मौनी रॉय. - Divya Marathi
(L) बॉयफ्रेंड मोहित रैना आणि एक्स बॉयफ्रेंड गौरव चोपडासोबत मौनी रॉय.

मुंबई - टीव्हीवरील 'नागिन' अर्थात मौनी रॉय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा दावा एका लिडिंग वेबसाइटने केला आहे. मौनी रॉयची क्लोज फ्रेंड आश्का गोराडियाचे नुकतेच लग्न झाले आहे. यावेळी तिने एका एंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मौनीही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचा गौप्यस्फोट केला. 'देवों के देव...'चा अॅक्टर मोहित रैनासोबत मौनीचे अफेअर असून लवकरच ते दोघे विवाह करणार असल्याचे आश्काने सांगितले. वास्तविक याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. 

 

या टीव्ही शोच्या सेटवर झाले अफेअर.. 
- मोहित आणि मौनी दोघांचे बऱ्याच दिवसांपासून अफेअर सुरु आहे. दोघेही 'देवों के देव...महादेव' शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. 
- मोहित शोमध्ये शंकराच्या भूमिकेत तर मौनी महादेवाची अर्धांगिनी सतीच्या रोलमध्ये होती. 
- असे म्हटले जाते की शोच्या सेटवरच मौनी आणि मोहितचे अफेअर सुरु झाले होते. 
- महादेवनंतर मोहित  'चक्रवर्ती सम्राट अशोक'मध्ये दिसला होता. तर मौनी सर्वात प्रसिद्ध शो 'नागिन-2' मधून सर्वांच्या परिचयाची झाली आहे.  

बिग बॉस कंटेस्टंट गौरवसोबत होते अफेअर... 
- टीव्ही अॅक्ट्रेस नारायणी शास्त्री आणि अॅक्टर गौरव चोपडाने 'पिया का घर' आणि 'घर की लक्ष्मी बेटियां' सारख्या सीरियलमधून काम केले होते. 
- दोघांच्या ऑनस्क्रिन रिलेशनसोबतच त्यांची ऑफ स्क्रिन केमेस्ट्रीही चर्चेचा विषय झाली होती. यानंतर हे कपल 'नच बलिए सीजन 2' मध्येही सहभागी झाले होते. 
- काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बातम्या आल्या की यांचे ब्रेकअप झआले असून त्याचे कारण गौरवच्या आयुष्यात मौनीची एंट्री मानली जात होती. 
- यानंतर गौरव आणि मौनी टीव्ही शो  'पति पत्नी और वो'मध्ये एकत्र आले होते. मात्र काही वर्षानंतर गौरव-मौनी यांच्यातही बिनसले. 
- गौरव चोपडा 'सावधान इंडिया', 'बिग स्विच 4' आणि 'बिग बॉस-10'चा कंटेस्टंट होता. 

 

आई-वडिलांची इच्छा होती जर्नलिस्ट व्हावे
- 28 सप्टेंबर 1985 ला पश्चिम बंगालमधील कुच बिहार येथे जन्मलेल्या मौनी रॉयचे प्राथमिक शिक्षण कुच बिहार येथील केंद्रीय विद्यालयात झाले. 
- त्यानंतर दिल्लीमध्ये आली आणि मिरांडा हाऊस येथून इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्यूएशन करण्याचे निश्चित केले. मात्र  तिच्या पालकांची इच्छा होती की मौनीने जर्नलिस्ट व्हावे. 
- त्यासाठी मौनीने दिल्लीतील जामिया-मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीमध्ये मास कम्यूनिकेशनला अॅडमिशन घेतले. 
- मौनीने ग्रॅज्यूएशनचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अॅक्टिंगकडे मोर्चा वळवला. 

 

आजोबा होते प्रसिद्ध कलाकार 
- मौनीचे आजोबा शेखर चंद्र रॉय हे एकेकाळी प्रसिद्ध नाट्यकलावंत होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठे नाव कमावले होते. 
- मौनीची आई मुक्ति या देखील थिएटर आर्टिस्ट आहेत. मौनीचे वडील कूच बिहारच्या जिल्हा परिषदेत सुप्रीटेंडेंट आहेत. 
 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोहित रैनासोबत मौनी रॉय... 

बातम्या आणखी आहेत...