आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जय आणि माहीमध्ये रंगणार काटें की टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'नच बलिये' या सेलिब्रिटी डान्स रिअ‍ॅलिटी शोचे विजेते ठरलेले जय भानुशाली आणि माही विज यांच्यातच आता रंगणारेय काटें की टक्कर.

आत्ता कुठे तर यांनी विजयाची चव चाखली. आता असे काय झाले की हे दोघे समोरा-समोर आलेत ? हाच विचार तुमच्या मनात डोकावला असेल ना. चला तर मग आम्ही तुम्हाला याचे उत्तर देतोय.

आगामी 'नच बलिये श्रीमान वर्सेस श्रीमती' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये हे दोघे समोरा समोर येणार आहेत. 'नच बलिये'मध्ये आजवर आपण सेलिब्रिटी कपल्सना एकत्र परफॉर्म करताना बघितले होते. मात्र आता हे कपल्स एकत्र नव्हे तर एकमेकांच्या विरोधात परफॉर्म करायचे आहे.

'श्रीमान श्रीमती' या शोमध्ये एकूण आठ जोड्या सहभागी होणार असून 'गर्ल्स वर्सेस बॉईज' असा हा शो रंगणार आहे. म्हणजेच गर्ल्स आणि बॉईजच्या टीममध्ये ही टशन बघायला मिळणार आहे. या आठ जोड्यांमध्ये जय-माही, रवी-सरगुन, राहुल महाजन-डींपी महाजन, गुरमीत-देबीना आणि तनाज-बख्तियार या पाच जोड्यांचा समावेश आहे. इतर तीन जोड्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

पुढील महिन्यापासून या शोच्या शुटिंगला सुरुवात होणार असून 12 एप्रिलपासून हा शो स्मॉल स्क्रिनवर दाखल होणार आहे. हा शोसुद्धा शिल्पा शेट्टी जज करणार असल्याची चर्चा आहे. चला तर मग गर्ल्स वर्सेस बॉईजमधील ही टक्कर कशी रंगणार हे पाहुया...