आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नच बलिये 5'मधून शेफाली-पराग बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली शेफाली आणि तिचा पती पराग त्यागी नच बलिये 5 या शोमधून एलिमिनेट झाले आहेत. नच बलिये 5 या सेलिब्रिटी कपल डान्स रियालिटी शोमध्ये गेल्या आठवड्यापासून एलिमिनेशनला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात दीपशिखा आणि केशव ही जोडी एलिमिनेट झाली होती. या आठवड्यात प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतांमुळे स्मिता-अंकुश आणि शेफाली-पराग या दोन जोड्या डेंजर झोनमध्ये आल्या होत्या. मात्र शेफाली-परागला स्मिता-अंकुशपेक्षासुद्धा कमी मते मिळाल्यामुळे त्यांना या शोबाहेर पडावे लागले.
स्मिता बन्सल सध्या आपल्याला बालिका वधू या मालिकेत सुमित्राच्या भूमिकेत दिसत आहे. तर पराग त्यागी पवित्र रिश्ता मालिकेत आहे.
आता या आठवड्यात शेफाली-पराग बाहेर पडल्यानंतर पुढील आठवड्यात कोणती जोडी डेंजर झोनमध्ये येणार याकडे नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहील.