आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nargis Fakhri,Freida Pinto Bold Talk On Koffee With Karan

नर्गिस-फ्रिडाच्या बोल्ड वक्तव्यांमुळे \'कॉफी विथ करन\'चे होणार उशीरा रात्री प्रसारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत असलेला 'कॉफी विथ करन' हा शो आता जरा जास्तच बोल्ड झालेला दिसतोय. कारण, आपल्या `बोल्डनेस`मुळे या कार्यक्रमाला चक्क आपली वेळ बदलण्याची वेळ आलीय.
नेहमी प्राईम टाईममध्ये प्रसारित होणारा `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम या आठवड्यात मात्र लेट नाईट म्हणजे रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे आणि याला कारण म्हणजे अभिनेत्री नर्गिस फाकरी आणि फ्रिडा पिंटो. पहिल्यांदाच 'कॉफी विथ करन' हा कार्यक्रम इतका बोल्ड झालेला दिसतोय. या कार्यक्रमात फ्रिडा आणि नर्गिस आपल्या बोल्डनेसच्या सीमारेषेवर पोहचलेल्या दिसतायत. या एपिसोडचा कंटेट इतका अॅडल्ट आहे की तो प्राईम टाइमला दाखवला जाऊ शकत नाही, यामुळे चॅनलला कार्यक्रमाची वेळच बदलावी लागलीय.
दोन्ही अभिनेत्री या शोमध्ये अतिशय फ्रँक होत्या आणि सेक्स बद्दल विचारलेल्या प्रश्नांना अतिशय बोल्डनेसने उत्तर दिलं. इतकंच नाही तर दोघींनी आपल्या नावाचा अर्थ दुसऱ्याच `बोल्ड` भाषेत सांगितला, जे ऐकून करण तर `थंड`च पडला. या शोचे पुर्नप्रसारणसुद्धा उशीरा रात्रीच करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी स्टार वर्ल्डवर रात्री 11 वाजता पहिल्यांदा प्रसारित होणार आहे.
या शोमध्ये करण सेलिब्रिटींना त्यांच्या अफेअरविषयी आणि इतरही काही खासगी गोष्टींविषयी विचारणा करत असतो. मागील भागांत अनुराग कश्यप आणि अनुष्का शर्मा यांनी शोमध्ये हजेरी लावली होती.