आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS : 25 कोटींत तयार झाला सिद्धूचा आशियाना, सिंगापूरहून मागवले होते 2.5 कोटींचे शिवलिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः नवज्योत सिंह सिद्धू सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांनी 'द कपिल शर्मा' शोला रामराम ठोकला अशी बातमी आहे. मात्र या शोची क्रिएटीव्ह हेड प्रीती सिमोसने एका पत्रकाद्वारे सिद्धूने अद्याप सोनी वाहिनीला नोटिस दिलेली नाही किंवा शो सोडण्याची माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सिद्धू यांनी जेवढे यश क्रिकेटच्या मैदानावर मिळवले, तितकेच ते टीव्हीवरसुद्धा हिट ठरले आहे. एक नजर टाकुया त्यांच्याशी निगडीत खास गोष्टींवर...

सिद्धू यांचे लग्झरी घर...
दोन वर्षांपूर्वी सिद्धू यांनी आपले नवीन घर बनवले. 49 हजार 500 स्वे. फूट परिसरात असलेल्या या आलिशान घरात स्विमिंग पूल, जिम, स्पा यांसारख्या लग्झरी सुविधा उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर 2014 मध्ये जेव्हा सिद्धू यांच्या कुटुंबीयांचा गृहप्रवेश झाला होता, त्यावेळी त्यांनी घरात स्थापित केलेल्या शिवलिंगाची खूप चर्चा झाली होती. सिद्धू यांनी हे शिवलिंग खास सिंगापूरहून मागवले होते. याची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये होती. या घराच्या निर्मितीला तीन वर्षांचा कालावधी लागला. या घरासाठी तब्बल 25 कोटींचा खर्च आल्याचे म्हटले जाते. घराच्या गार्डनमध्ये चोहोबाजुंनी 100 ते 600 वर्षे जुनी झाडे लावली आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, सिद्धू यांच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...