आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Pics: 25 कोटींत तयार झाला सिद्धूचा आशियाना, GYMपासून SPAपर्यंत सर्व काही आहे येथे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाचे मैदान असो वा राजकारणाचा आखाडा, ठिकान कोणतेही असो नवज्योतसिंग सिद्धू नेहमीच हसतमुख आणि आनंदी दिसतो. 20 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी आम्ही आपल्याला सांगत आहोत अमृतसर येथील त्याच्या नव्या घरा संदर्भात.
असे आहे सिद्धू यांचे घर...
- 49 हजार 500 चौरस फूट एवढ्या विस्तिर्ण जागेवर असलेल्या या आलिशान घरात स्वीमिंग पूल, जिम आणि स्पा सारख्या लग्झरी सुविधा आहेत.
- एवढेच नाही तर, 2014 मध्ये जेव्हा सिद्धू कुटुंबाने गृह प्रवेश केला होता, तेव्हा येथे स्थापित केलेल्या शिवलिंगाची बरीच चर्चेचा होते. अशी चर्चा होती की, हे शिवलिंग सिंगापूरहून मागवण्यात आले होते. याची किंमत साधारणपणे अडीच कोटी रुपये एवढी आहे. - या शिवलिंगाच्या पुजेसाठी विविध ठिकाणांहून पंडितही बोलावण्यात आले होते. या पुजेत सिद्धूची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धूदेखील त्याच्याबरोबर होती. या बरोबरच या घरात बांधण्यात आलेल्या मंदीरात माता गायत्री, भगवान गणेश आदी देवांच्या मौल्यावान मूर्ती आहेत. तर एका दुसऱ्या खोलीत श्री गुरु ग्रंथ साहिब ठेवण्यात आले आहेत.
गृह प्रवेशानंतर एका वर्षाने शिफ्ट झाले कुटुंब
- मे 2014 मध्ये अमृतसर येथील या नव्या घराचा गृह प्रवेश तर केला गेला, मात्र सुद्धूचे कुटुंब येथे राहण्यासाठी आले नव्हते.
- ते येथे साधारणपणे एक वर्षानंतर जुलै 2015 मध्ये येथे राहण्यासाठी आले.
- हे घर बांधायला साधारणपणे तीन वर्षे लागली. बोलले जाते की, हे घर बांधणयासाठी सिद्धू कुटुंबाला साधारणपणे 25 कोटी रुपये खर्च आला.
- या घराच्या गार्डनच्या चारही बाजूंना 100 ते 600 वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रजातींच्या झाडांची रोपे लावलेली आहेत. जी चेन्नई, गोवा आणि बेंगळुरु येथून मागवण्यात आली आहेत. - ऑलिव प्रजातींच्या झाडांची ऊंची 8 ते 12 फूट आहे. या शिवाय बोगन विलियाची 10 झाडे आहेत, ते साधारणपणे 100 ते 150 वर्ष जुनी आहेत.

सिद्धू यांचे प्रोफाइल
- माजी क्रिकेटर आणि राजकिय नेते असलेल्या नवज्योत सिंह सिद्धू यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1963 रोजी पंजाबमधील पटियालात झाला.
- त्यांचे वडील सरदार भगवंत सिंह सिद्धू हेदेखील एक क्रिकेटर होते. त्यांचा मुलगा नवज्योतने आघाडीचा क्रिकेटर व्हावा अशी त्यांची इच्छा होती.
- सिद्धू यांनी पटियाला येथील यदिवेंद्र स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यानंतर चंडीगडच्या के मोहिन्द्रा कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पंजाब युनिव्हर्सिटीतून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.
- नवज्योत सिंह यांच्या पत्नीचे नाव नवजोत कौर असून त्या डॉक्टर आहेत. पंजाब विधानसभेच्या त्या सदस्यासुद्धा आहेत.
- या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. राबिया हे त्यांच्या मुलीचे तर करण हे मुलाचे नाव आहे.
- सिद्धू अतिशय सात्विक व्यक्ती असून सिगारेट, दारुला स्पर्श करीत नाहीत.
- आपल्या शेरों-शायरीने ते सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिद्धू यांच्या आलिशान घराचे Inside Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...