आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिलच्या शोमध्ये सिद्धूने केले WIFE ला KISS, सांगितली लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू लवकरच कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहेत. यूट्यूबवर या एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. शोमध्ये नवजोत सिद्धूंच्या शायरींची खिल्ली उडवताना दिसणार आहेत. शिवाय त्यांनी आपली लव्ह स्टोरीविषयीसुद्धा सांगणार आहेत.

सिद्धूंनी कसे केले होते प्रपोज...
- शोमध्ये नवजोत यांनी सांगितले, की जेव्हा त्या कॉलेजमधून घरी जायच्या तेव्हा सिद्धू त्यांना बघण्यासाठी उन्हात उभे राहायचे.
- सिद्धू यांनी प्रपोज करायला फार काळ लावल्याचे नवजोत यांनी सांगितले. इतकेच नाही तर प्रपोज केल्याच्या वर्षभरानंतर सिद्धू यांनी त्यांची लग्नपत्रिका जुळवायचा विचार त्यांच्याकडे मांडला.
- लग्नपत्रिका जुळली तरच लग्न होईल असे, सिद्धू यांनी नवजोत यांना म्हटले होते.

रोमँटिक गाण्यावर पत्नीसोबत थिरकले सिद्धू
- शोमध्ये रोमँटिक गाणे वाजवण्यात आले.
- यावेळी सिद्धू यांनी पत्नीसोबत ताल धरला आणि त्यांना किसही केले.
- शोमध्ये सिद्धूंची मुलगी राबियासुद्धा हजर होती. हा एपिसोड शनिवारी टेलिकास्ट होणारेय.

काय करतात सिद्धूंच्या पत्नी नवजोत..
- नवजोत कौर सिद्धू या डॉक्टर आहेत. राजकारणात सहभागी होण्यासाठी त्यांनी जानेवारी 2012 मध्ये पंजाब आरोग्य विभागात राजिनामा दिला होता.
- त्यांना अमृतसर इस्टहून बीजेपीकडून आमदारकीचे तिकिट मिळाले होते. निवडणूकीत विजयी ठरल्यानंतर त्यांची बीजेपी पार्लामेंट्रीच्या मुख्य संसदीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
- डॉ. नवजोत कौर सिद्धू यांचा जन्म 15 जून 1963 रोजी लुधियानात झाला. त्यांचे शालेय शिक्षण लुधियानातूनच पूर्ण झाले.
- त्यानंतर 1981-85 या काळात पटियालातून त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर 1990-92 याकाळात पटियालाच्या राजेंद्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसीन केले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, कपिलच्या शोमध्ये पोहोचलेल्या सिद्धू फॅमिलीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...