मुंबई: 'डॉन 2', 'भाग मिल्खा भाग' आणि 'दिलवाले'सह अनेक सिनेमांत काम केलेला अभिनेता नवाब शाहने (40) 9 वर्षे लहान अभिनेत्री कविता कौशिकशी असलेल्या नात्यावर मौन तोडले आहे. त्यांने स्वीकार केले, की तो पाच वर्षांपासून कविता डेट करत आहे. परंतु लग्नाबाबत काहीच स्पष्ट केले नाहीये. divyamarathi.comसोबत बातचीत करताना त्याने सांगितले, 'लग्नाचा काहीच घाई नाहीये. कदाचित होणारसुध्दा नाही. आम्हाला नेहमी असेच राहायला आवडेल (हसून)'
नात्याविषयी काय म्हणाला नवाब?
नवाब म्हणाला, 'मी नेहमी खासगी आयुष्याविषयी कमेंट करण्यास टाळतो. परंतु, मी नकार देत नाही, की कविता माझे प्रेम आहे. आम्ही पाच वर्षांपासून डेट करत आहोत आणि मी या नात्याने आनंदी आहे. माझ्यासारख्या वाइल्ड मॅनसाठी तिच्यासारखी महिला हवी होती. मला कसे कंट्रोल करायचे आहे, हे तिला चांगल्याप्रकारे माहिती आहे. मला तिचा अभिमान आहे.'
कविताचे आई-वडील या नात्याच्या विरोधात?
मीडियामध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कविताचे आई-वडील नवाब आणि कविताच्या नात्याला पाठिंबा देत नाहीये. नवाबला याविषयी विचारल्यानंतर त्याने सांगितले, 'असे काही नाहीये. आम्ही दोघे आमच्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यामुळे अशा रिपोर्ट्समध्ये काहीच तथ्य नाहीये.'
या अटीवर नवाबसोबत लग्न करू शकते कविता...
'FIR' फेम कविता कौशिकला नवाब शाहसोबत लग्न करायचे आहे. परंतु तिची एक अट आहे. कविताचे म्हणणे आहे, की तिच्या आई-वडिलांची परवानगी मिळेपर्यंत ती नवाबसोबत लग्न करू शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नवाब आणि कविताचे Photos...