आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neha Dhupiya And Tushar Kapoor In Nautanki The Comedy Theater

तुषार-नेहा करणार ‘नौटंकी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री नेहा धूपिया आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. कॉमेडीमध्ये पदार्पण करत आहे. कलर्स चॅनलवर सुरू होणार्‍या ‘नौटंकी द कॉमेडी थिएटर’ या कार्यक्रमात ती अभिनेता तुषार कपूरसोबत दिसणार आहे. नेहा आणि तुषार या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. नेहाने याआधी ‘फंस गए रे ओबामा’मध्ये लेडी गब्बर सिंहची भूमिका आणि ‘क्या कूल हैं हम’ या सिनेमात विनोदी भूमिका साकारल्या आहेत.

या कार्यक्रमात अनेक विनोदी कलावंत पाहायला मिळणार आहेत. यात गुग्गी, जालंधर के पापे, काम्या पंजाबी, छोटी गंगूबाई अर्थातच सलोनी दानी आणि निखिल रत्नपारखी प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. बिग बॉसचा स्पर्धक राहिलेला विशाल कर्नवालसुद्धा या कार्यक्रमात पाहुणा कलावंत म्हणून दिसणार आहे. अलीकडेच 'बिग बॉस 6'च्या ग्रँड फिनालेमध्ये तुषार कपूर आणि नेहा धुपिया आपल्या या शोचे प्रमोशन करताना दिसले होते.