'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. कपिल शर्माच्या या कार्यक्रमात केवळ बॉलिवूडमधीलच नव्हे तर क्रिकेट जगतातील सेलिब्रिटीसुद्धा हजेरी लावत असतात. एक तास प्रसारित होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांना टेंशन फ्री करत असतो. मात्र प्रेक्षकांना तासभर पोटधरुन हसवायला लावणारे या कार्यक्रमातील कलाकार, त्यांची संपूर्ण टीम यासाठी तब्बल 24 ते 30 तास मेहनत घेत असतात. म्हणजेच एक एपिसोड तयार करण्यासाठी या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमला 24 ते 30 तास काम करावे लागते.
अलीकडेच कपिलने क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यासह एपिसोडचे शुटिंग केले. यावेळी हे शूट इंडोअर न करता आउटडोअर करण्यात आले. मैदानात युवराज आणि हरभजन कपिल शर्मासह क्रिकेट खेळताना या एपिसोड दाखवण्यात येणार आहे. या एपिसोडसाठीसुद्धा काही तास आधी रिहर्सल करण्यात आली होती.
आजवर प्रेक्षकांनी या शोमध्ये पडद्यावर घडणा-या गंमतीजमती पाहिल्या आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला या शोच्या पडद्यामागील घडामोडी खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवरील बिहाईंड द सीन्स...