आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Never Seen Before Pictures Of Nach Baliye 6 Winners Rithvik Dhanjani & Asha Negi

PHOTOSमध्ये पाहा 'नच बलिये 6'चे विजेते ऋत्विक-आशाची केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भव्यतेला साजेशा वातावरणात 'नच बलिये सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी डान्स शो' च्या सहाव्या पर्वातील अंतिम सोहळयात टेलिव्हिजनवरील ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी या लोकप्रिय जोडप्याला विजेते म्हणून घोषित करण्यात आले. या जोडप्याला रोख 35 लाख रूपये, रेनॉल्ड डस्टर कार आणि 'शादी के साईड इफेक्टस' या सिनेमाच्या सौजन्याने ऑस्ट्रेलियातील गोल्ड-कोस्ट टूरचे बक्षिस मिळाले आहे.
ऋत्विक आणि आशा ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत अर्जुन आणि पुर्वीची भूमिका साकारणारे ऋत्विक आणि आशा यांच्यात या मालिकेच्या सेटवरच सूत जुळले. या मालिकेत दोघांनीही नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. पडद्यावर नवरा-बायकोची भूमिका साकारणा-या या दोघांना खासगी आयुष्यात मात्र लग्नाची भीती वाटते.
जेव्हा या दोघांना त्यांच्या लग्नाविषयी विचारले, तेव्हा ऋत्विक म्हणाला, ''मी आणि आशा दोघेही लग्नाला घाबरतो. सध्या आम्ही खूप तरुण आहोत. आशा 23 वर्षांची तर मी केवळ 24 वर्षांचा आहे. सध्या तरी आमचा लग्नाचा विचार नाहीये. लग्नासाठी आम्ही चार ते पाच वर्षे घेणार आहोत. मी सध्या 24 वर्षांचा आहे. त्यामुळे वयाच्या 28व्या किंवा 29व्या वर्षी मी लग्नगाठीत अडकेल. सध्या तरी आम्ही दोघेही लग्नासाठी तयार नाहीत.''
असो, अद्याप या दोघांच्या लग्नाला बराच कालावधी असला, तरीदेखील या दोघांमधील केमिस्ट्री चांगली जमली आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या रिअल लाईफ कपलची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा एकत्र कसे दिसतात ऋत्विक आणि आशा...