(फोटोमध्ये अभिनेता मनीष राय सिंघानिया)
मुंबईः छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ससुराल सिमर कामध्ये अभिनेता मनीष राय सिंघानिया कमबॅक करतोय. या मालिकेत आता तो नवीन लूकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. मनीषचे फॅन्स गेल्या काही दिवसांपासून त्याला छोट्या पडद्यावर मिस करत होते. मनीषने पुन्हा एकदा या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केल्याची बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून
आपल्या चाहत्यांना दिली आहे.
मनीषला या शोमधील कमबॅकविषयी विचारले असता, तो म्हणाला, 'अभिनय माझा आवडता गेम असून ससुराल सिमर का माझे होम ग्राऊंड आहे. मी पुन्हा एकदा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आलोय, याचा मला आनंद आहे. चाहत्यांनी मला मिस केले. त्यांच्या प्रेमासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.'