आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See New Pics Of TV Actress Divyanka Tripathi And Vivek Dahiya\'s Engagement

साखरपुड्याचे New Pix : दिव्यांका-विवेक ऑफिशिअली एन्गेज्ड, दोघांचे हे अरेंज्ड मॅरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'ये है मोहब्बतें' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिचा नुकताच साखरपुडा झाला असून या मालिकेतील तिचा को-अॅक्टर विवेक दहियासोबत ती ऑफिशिअली एन्गेज्ड झाली आहे. चंदीगडमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. दिव्यांकाच्या पालकांनी विवेकला पसंत केले. त्यांच्या म्हणण्यावरून दोघांनी साखरपुडा उरकला. याविषयी दिव्यांका म्हणाली, ''आमचे अरेंज्ड मॅरेज आहे. आमचे लग्न आई-वडिलांच्या सहमतीने होत आहे.''
साखरपुड्याला दिव्यांका आणि विवेकच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र उपस्थित होते. 'ये है मोहब्बतें'ची टीम यावेळी दिसली नाही. एन्गेज्मेंट सेरेमनीत दिव्यांका आणि विवेक ताल धरताना दिसले. यावर्षाच्या अखेरीस हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत.
दिव्यांका त्रिपाठी आणि 'महाराणा प्रताप' फेम शरद मल्होत्रा यांचे 2015 मध्ये ब्रेकअप झाले. दोघे जवळजवळ 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेच्या सेटवर शरद आणि दिव्यांकाचे सूत जुळले होते. मात्र गेल्याचवर्षी दोघांचे ब्रेकअप झाले.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला दिव्यांका-विवेकच्या साखरपुड्याची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कसा थाटात झाला दोघांचा साखरपुडा...