आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 ऑक्टोबरपासून तुमच्या भेटीला येणार Bigg Boss 9, रात्री 10:30 वाजता होणार प्रसारित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बिग बॉस'च्या प्रोमोमध्ये सलमान खान)
मुंबई- वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस डबल ट्रबल' 11 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. याची माहिती शोच्या नवीन प्रोमोमध्ये देण्यात आली आहे. प्रोमो बॅकग्राऊंडमध्ये दोन जोकर दिसत आहे, होस्ट सलमान खान शोच्या फॉर्मेट समजावताना दिसत आहे. सलमान म्हणतो, 'या घरात सदस्यांना वाटते LOL, ट्रू कॉल्स, या घरात नाहीत कुणी फ्रेंडली... म्हणून बिग बॉसने केला विचार, सोबत बसाल तर वाढेल प्रेम. अरे यार.. दॅट इज द ऑनली रीजन वाइ...वन प्लस वन...इज...डबल...ट्रबल. यू नो टू हाउ...देन चेकआउट बिग बॉस नाउ.' प्रोमोच्या शेवटी शोचा प्रसारण वेळसुध्दा दिली आहे. यावेळी हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10:30 वाजता प्रसारित होणार आहे. मात्र 11 ऑक्टोबरपासून याचे प्रीमिअर रात्री 9 वाजेपासून आहे.
जोड्यांमध्ये राहतील स्पर्धक-
'बिग बॉस'च्या आत्ताच्या प्रोमोमध्ये जोकर्स दिसणार आहेत. यावेळी घरात स्पर्धक दोन-दोन जोड्यांमध्ये राहणार आहेत. कदाचित या फॉर्मेटमुळेच या पर्वाला 'बिग बॉस डबल ट्रबल' नाव देण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रोमोमध्ये जोकर्सच्या माध्यमातून कशाप्रकारे समजावण्यात आला फॉर्मेट...