Home »TV Guide» Newly Married Bharti Singh Back From Goa With Husband Harsh Limbachiya

लग्नानंतर समोर आले भारतीचे First Photo, हसबंडसोबत होती या लूकमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 11:23 AM IST

कॉमेडियन भारती सिंहचे नुकतेच लग्न झाले असून ती हसबंड हर्ष लिम्बाचियासोबत गळ्यात मंगळसूत्र, हातात लाल बांगड्या आणि भांगात सिंदूर असलेल्या लूकमध्ये स्पॉट झाली आहे. यावेळी तिने शोल्डर कट डार्क पिंक कलरचा गाऊन घातलेला होता.

गोव्यावरुन परतले जोडपे...
- भारती सिंह आणि हर्ष लिम्बाचिया लग्ना-रिसेप्शन हनीमुन उरकून गोव्यातून मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावर दोघे स्पॉट झाले. बुधवारी भारती-हर्षचे गोव्यातील हनीमूनचे फोटोज समोर आले होते. याआधी अशी माहिती होती, की हे नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी यूरोप टूरवर जाणार आहे, मात्र कामाच्या व्यापामुळे त्यांनी हा प्लॅन कँसल केला आहे.

6 दिवस चालला भारतीचा विवाह सोहळा
- भारती सिंहच्या लग्नाचे विविध फंक्शन 6 दिवस सुरु होते. यामध्ये बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमापासून माता की चौकी, हळदी, पूल पार्टी, मेहंदी, कॉकटेल पार्टी, लग्न आणि रिसेप्शन असे विविध समारोहांचा समावेश होता. या सर्व फंक्शनमध्ये भारती आणि हर्षचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते. सर्वांनी भारतीचे लग्न खूप एंजॉय केले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारती - हर्षचे 5 फोटोज...

Next Article

Recommended