'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रक्षंदा खान टीव्ही स्टार सचिन त्यागीसह लग्नगाठीत अडकली. 15 मार्च रोजी थाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यापूर्वी 13 मार्चला संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. लग्नात रक्षंदा आणि सचिनचे खास मित्र सहभागी झाले होते. पाहुण्यांमध्ये मोना सिंह, शिल्पा अग्निहोत्री, निगार खान यांचा समावेश होता.
अलीकडेच रक्षंदा आणि सचिनच्या लग्नाची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्सवर समोर आली आहेत. रक्षंदा आणि सचिनची पहिली भेच 2008मध्ये कभी कभी प्यार कभी कभी यार या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. सचिनचे हे दुसरे लग्न असून त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत.
सचिन आणि रक्षंदा यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रक्षंदा आणि सचिनच्या वेडिंग अल्बममधील खास छायाचित्रे...