आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुपम खेर यांची छोट्या पडद्यावर एंट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनय क्षेत्रात विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण भूमिका साकारणारे अनुपम खेर आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ते छोट्या पडद्यावर एक चॅट शो सुरू करत असून ‘कुछ भी हो सकता है’ असे त्याचे शीर्षक असणार आहे. या शोमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटीजच्या जीवनातील काही संघर्षमय कथांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिवाय निराशाजनक काळाच्या गर्तेतून बाहेर पडून स्टारडम मिळवण्याची कथा या शोमध्ये समाविष्ट असेल.
स्वत: अनुपम खेर आपल्या जीवनातील काही चांगल्या गोष्टींबरोबर कटू गोष्टी शोमध्ये शेअर करतील. हा चॅट शो प्रेक्षकांना पोट धरून हसवेलच; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांतून अश्रुदेखील आणेल, असा अनुपम यांना विश्वास आहे. अनुपम खेर मानतात की, टीव्हीचे माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा चॅट शो कलर्स चॅनलवर या महिन्याच्या शेवटपर्यंत प्रसारित होण्याची शक्यता आहे.