Home »TV Guide» Nia Sharma New Photoshoot

'जमाई राजा'च्या अॅक्ट्रेसने केले फोटोशूट, व्हायरल झाले PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 12:14 PM IST

मुंबईः 'जमाई राजा' या मालिकेत रोशनीची भूमिका साकारुन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. अलीकडेच नियाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये निया ब्लॅक कलरचा ड्रेस आणि ब्लॅक लिपस्टिक लावून दिसतेय. हे फोटोज नियाचे नवीन व्हिडिओ साँग 'Raat Ki' च्या शूटिंगनंतर केलेल्या फोटोशूटमधील आहेत. या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला असून यामध्ये तिचा बोल्ड अंदाज लक्ष वेधून घेतोय. नियाने हे फोटोशूट लिकर बॉटल्सच्या बॅकग्राऊंडवर केले आहे. तर काही फोटोजमध्ये ती पूलजवळ उभी दिसतेय. सर्वच फोटोजमध्ये नियाचा बोल्डनेस स्पष्ट दिसतोय.

व्हिडिओवरुन झालेल्या वादात अडकली होती निया..
नियाने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर एक कॉन्ट्रोव्हर्शिअल व्हिडियो शेअर केला होता. यामध्ये एक लहान मुल शिवीगाळ करताना दिसत होता. नियाने शेअर केलल्या या व्हिडिओवर टीकेची झोड उठली होती.

गेल्यावर्षी ठरली आशियातील तिसरी सेक्सी वुमन
- डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला आशियातील तिस-या सेक्सी महिलेचा किताब मिळाला होता.
- 2014 मध्ये 'जमाई राजा' मालिकेमुळे निया लाइमलाइटमध्ये आली होती.
- निया 2016 मध्ये ही मालिका सोडली. या मालिकेव्यतिरिक्त ती 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेत क्रिस्टल डिसूजाच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती.

पुढील स्लाईड्सवर बघा, नियाच्या फोटोशूटची खास झलक आणि शेवटच्या स्लाईडवर नियाचा बोल्डनेस दाखवणारा गाण्याचा व्हिडिओ...

Next Article

Recommended