आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने चिमुकल्यासोबतचा असा व्हिडिओ केला शेअर, फॅन्स म्हणाले - जरा लाज बाळग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई. 'जमाई राजा' या मालिकेत रोशनीची भूमिका वठवणारी अभिनेत्री निया शर्माने इन्स्टाग्रामवर एक कॉन्ट्रोव्हर्शियल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक चिमुकला मुलगा वारंवार शिवीगाळ करताना दिसतोय. नियाने फोटोसोबत लिहिले, "एखाद्या खट्याळ मुलावर माझा किती जीव आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी त्याची मावशी आहे. माझा बेस्ट फ्रेंड हा चिमुकला आहे आणि आता मी यावरही विश्वास ठेऊ शकत नाहीये." नियाने व्हिडिओच्या माध्यमातून अपील केली, की लोकांनी या लहान मुलाच्या शिवीकडे लक्ष देऊ नये.  
 
फॅन्स म्हणाले - जरा तर लाज बाळग 
- नियाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्यावर प्रचंड टीका होत आहे.
- अनेक युजर्सनी तिला तुला लाज वाटायला हवी, असे म्हटले आहे.
- इतकेच नाही तर यूजर्सनी तिला प्रश्न केला, "तुला मॅनर्स नाहीत का? तो लहान मुलगा आहे, त्याला कसली समज नाही. पण तुला ठाऊक असायला हवे, तो काय बोलतोय."

बोल्ड फोटो शेअर करुन असते चर्चेत 
- जानेवारीत नियाने इन्स्टाग्रामवर एक ब्रालेस फोटो शेअर केला होता.  त्यासोबत तिने लिहिले होते, "मी काय करतेय, हे मला समजत नाहीये. मी विचार न करता हे काम केले आहे. " 
- नियाच्या या फोटोवर अनेकांनी हॉट आणि सेक्सी अशा कमेंट केल्या तर अनेकांनी तिच्यावर बरीच टीकासुद्धआ केली. 
- एका फॅनने तर लिहिले, "वेडी झालीस का सगळं दिसतंय"

'चंद्रकांता'मध्ये साकारु शकते लीड रोल 
- रिपोर्ट्सनुसार निया शर्मा लवकरच कलर्स वाहिनीच्या  चंद्रकांता या मालिकेत लीड रोल साकारु शकते.
- एकता कपूरने तिची निवड 'चंद्रकांता'च्या लीड रोलसाठी केली आहे. पण अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

गेल्या वर्षी ठरली आशियाची तिसरी सेक्सी महिला 
- डिसेंबर 2016मध्ये निया शर्माची निवड आशियातील तिसरी सेक्सी महिला म्हणून झाली होती. 
- 2014 मध्ये तिला 'जमाई राजा' या मालिकेतील रोशनी या भूमिकेमुळे बरीच लोकप्रियता मिळाली. 
- नियाने 2016 मध्ये हा शो सोडला होता. 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकेत ती क्रिस्टल डिसूजाच्या लहान बहिणीच्या भूमिकेतही झळकली आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा नियाचे काही हॉट फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर नियाने शेअर केलेला व्हिडिओ...   
बातम्या आणखी आहेत...