सध्या बॉलिवूडमध्ये सनई चौघड्याचे सूर घुमू लागले आहेत. अलीकडेच शाहिद कपूर आणि मिनिषा लांबा हे बॉलिवूड स्टार्स बोहल्यावर चढले. आता या दोघांनंतर अभिनेत्री निगार खानसुद्धा नुकतीच विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड खय्याम शेखसोबत 23 जुलै रोजी निगारचा निकाह झाला. खय्याम पाकिस्तानी वंशाचा बिझनेसमन असून अबू धाबी येथे स्थायिक आहे. दुबईत या दोघांचे लग्न झाले.
निगार ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गौहर खान हिची थोरली बहीण आहे. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस' या शोमध्ये निगारची एन्ट्री झाली होती.
इंडिया कॉलिंग (2005-2006), 'कसम से' (2007), 'मितवा : फूल कमल के' (2009-2010), 'सावित्री' (2013) आणि 'बुद्ध' (2013) या मालिकांमध्ये निगार झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, निगारच्या लग्न, संगीत सोहळ्यात क्लिक झालेली निगार आणि गौहर खानची खास छायाचित्रे...