आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खतरों के खिलाडी'मध्ये थंगाबली दाखवणार आपला दम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमातील हॅण्डसम व्हिलन थंगाबली अर्थातच अभिनेता निकेतन धीर आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
'खतरों के खिलाडी'च्या पाचव्या पर्वात निकेतन सहभागी होणार आहे. शोसाठी त्याने आपला होकार कळवला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनीच निकेतनचे नाव वाहिनीला सुचवले होते. खतरों के खिलाडीचे पाचवे पर्व चेन्नई एक्स्प्रसचे दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहेत.
'चेन्नई एक्स्प्रेस' या सनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर निकेतनने म्हटले होते, की त्याचे रोहित शेट्टीसह काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.