आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षीय निकिता ठरली मास्टरशेफची विजेती, मिळाले 1 कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत डावीकडून - संजीव कपूर, रणवीर बरार आणि विकास खन्नासोबत निकिता गांधी)
मुंबईः स्टार प्लस वाहिनीवर गेल्या 11 आठवड्यांपासून सुरु असलेल्या 'मास्टरशेफ इंडिया सीझन 4' च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये जन्मलेली आणि आता आता यूएईमध्ये स्थायिक झालेली निकिता गांधीने मास्टरशेफचे टायटल आपल्या नावी केले. 21 वर्षीय निकिताला भारतासोबत अन्य देशांतूनही लोकांचा पाठिंबा मिळाला. निकिता एक कोटी रुपये रोख आणि गोल्डन शेफ कोटची मानकरी ठरली आहे.
दुस-या स्थानावर मुंबईची नेहा शाह तर तिस-या स्थानावर हैदराबादची भक्ती अरोरा आहेत. नेहाला दहा लाख रुपये तर भक्तीला पाच लाख रुपये पुरस्काराच्या स्वरुपात मिळाले.
'मास्टरशेफ इंडिया सीझन 4'चा किताब आपल्या नावी करणारी निकिता म्हणाली, ''हा किताब मिळाल्यानंतर मला कसं वाटतंय हे सांगणं खूप कठीण आहे. मी सर्वप्रथम स्टार प्लस आणि तिन्ही परीक्षक संजीव कपूर, विकास खन्ना आणि रणवीर बरार यांना धन्यवाद देते. त्यांनी मला मंच दिला आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी दिली. मी माझ्या चाहत्यांनाही धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हा किताब आपल्या नावी करु शकले.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मास्टरशेफ इंडिया सीझन 4'च्या ग्रॅण्ड फिनालेची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...