आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : रियल लाईफमध्ये बाबा होणार \'नैतिक\', मित्रांबरोबर सेलिब्रेट केले बेबी शॉवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एंटरटेनमेंट डेस्क - टिव्हीवरील डेली सोप 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नैतिक (करण मेहरा) लवकरच बाबा बनणार आहे. त्याची पत्नी निशा रावल आई होणार असून या महिन्यात त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते. निशा आणि करणचे हे पहिले बाळ आहे. काही दिवसांपूर्वी निशाच्या घरी बेबी शॉवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निशा पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसून आली. यावेळी मित्रांच्या उपस्थितीत निशाने केकही कापला केले. 

6 वर्षे केले डेट 
'बिग बॉस 10' च्या स्पर्धकांपैकी एक असलेला करण सध्या सबवरील टिव्ही शो 'खटमल ए इश्क' मध्ये झळकत आहे. त्याच्या पत्नीच्या बेबी शॉवर सेलिब्रेशनमध्ये मुनिषा मोटवानी, युविका चौधरी, डिझायनर रोहित वर्मा यांच्यासह इतर मित्र उपस्थित होते. करण आणि निशा यांनी जवळपास 6 वर्ष डेटींग केल्यानंतर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले. निशादेखिल टिव्ही अॅक्ट्रेस आहे. तिने लाइफ ओके चॅनलच्या 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' (2012) मध्ये काम केले आहे. त्याशिवाय निशाने 'आने वाला पल' (2001), 'केसर' (2007) मध्येही काम केले आहे.  'नच बलिए' (2012-13) मध्ये ती करनसह सहभागी झाली होती. काही चित्रपटांतही तिने भूमिका केल्या आहेत. 'रफू चक्कर' (2008), 'हंसते-हंसते' (2008), 'जॅक अँड झोल' (2010), 'टॉम डिक हॅरी रॉक अगेन' (2011) मध्ये ती झळकली होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, निशाच्या बेबी शॉवरचे PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...