आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nivriti Issar Talked About Nasty Remark On Karishma’S Late Father

वाचा, करिश्माविषयी केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर काय म्हणाली पुनीत इस्सरची मुलगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः आई दीपाली इस्सरसोबत निवृत्ती)
मुंबईः अभिनेता पुनीत इस्सर यांच्या मुलीने अलीकडेच बिग बॉसची स्पर्धक करिश्मा तन्नाविषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यामुळे करिश्माचे चाहते तिच्यावर भडकले होते. याविषयीची आता ताजी बातमी ही आहे, की असे आक्षेपार्ह्य ट्विट आपण केलेच नसल्याचे निवृत्तीने म्हटले आहे. निवृत्ती म्हणाली, ''ट्विट खूप लज्जास्पद आहे. जेव्हापासून हे ट्विट पोस्ट करण्यात आले आहे, तेव्हापासून माझे कुटुंब चिंतित आहे. मी लगेचच माझ्या ट्विटर अकाउंटवर, हे ट्विट आपण केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.''
जेव्हा निवृत्तीला तिचे वडील पुनीत इस्सर आणि करिश्मा तन्ना यांच्यातील वादाविषयी विचारले असता, ती म्हणाली, "मी निश्चित हे सांगू शकते, की या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी द्वेष नाहीये. अशी परिस्थिती निर्माण झाली की ते एकमेकांच्या विरोधात उभे झाले. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा एकदा चांगले मित्र होतील."
निवृत्तीने करिश्माविषयी कोणते आक्षेपार्ह्य ट्विट केले होते..
निवृत्तीने हे वादग्रस्त ट्विट बिग बॉसची स्पर्धक करिश्मा तन्नाच्या वडिलांवर केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की "तिच्या वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, की करिश्मासारखी मुलगी असल्याने त्यांनी स्वतः आपली जीवनयात्रा संपवली." निवृत्तीचे हे ट्विट करिश्माच्या चाहत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर करणे सुरु केले होते.

निवृत्तीला लवकरच आपली चुक उमगली आणि तिने आपल्या ट्विटर अकाउंटची सेटिंग बदलून ट्विट्स प्रोटेक्टेड केले. इतकेच नाही तर निवृत्तीने ट्विटरवरील आपल्या नावातसुद्धा बदल केला. पूर्वी ट्विटरवर निवृत्तीचे नाव निवृती पी इस्सर असे दिसायचे. आता तिने ते बदलून निवृती इस्सर असे केले.

'बिग बॉस 8' सुरुवातीच्या एपिसोडमध्ये करिश्मा पुनीत इस्सरला बघून भावूक झाली होती. कारण तिला तिच्या वडिलांची आठवण झाली होती. पुनीतसुद्धा करिश्माला आपली मुलगी संबोधतात. 2012 मध्ये करिश्माच्या वडिलांचे निधन झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, निवृत्ती इस्सरविषयी बरेच काही...