आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीव्ही कलाकार मोना सिंगच्या कथित एमएमएसचे रहस्य अजुनही कायम आहे. पोलिसांना याप्रकरणी मुंबईच्याच एखाद्या व्यक्तीचा हात असण्याचा संशय आहे. ही व्यक्ती मोना सिंगच्या ओळखीची असू शकते, असाही पोलिसांना दाट संशय आहे. या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हा व्हिडिओ ज्या संगणकावरुन अपलोड करण्यात आला आहे, त्या संगणकाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
दुसरीकडे मोना सिंगच्या या एमएमएएसवरुन अफवादेखील पसरु लागल्या आहेत. खुद्द मोना सिंगनेच हा व्हिडिओ बनविला असून तिचा तो एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो, अशी चर्चा आहे. याचे कारण म्हणजे, मोनाचा प्रियकर विद्युत जामवालचा चित्रपट 'कमांडो' लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी चित्रपटासाठी लोकप्रियता गोळा करण्यासाठी असा एमएमएस तिनेच पसरविला असावा, अशी कुजबूज आहे. परंतु, मोनाने मात्र हे दावे फेटाळले आहेत. चित्रपटाच्या प्रचारासाठी असे काही करण्याची गरज नाही. कोणीही असे करणार नाही. मोनाने या व्हिडिओमागे एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचेही फेटाळले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.