आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन आनंदी म्हणते, 'नो लिपलॉक प्लीज'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स वाहिनीवरील 'बालिका वधू' या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळाला. तो म्हणजे प्रत्युषा बॅनर्जीने या मालिकेला रामराम ठोकला आणि तिची जागी आता तोरल रासपूत्र या अभिनेत्रीने घेतली.

आता पुन्हा एकदा या मालिकेत रंजक वळण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आनंदी आणि शिव यांच्यातला दुरावा आता दुर होताना दिसतोय. लवकरच मालिकेत या दोघांचा इंटीमेट सीन प्रसारित केला जाणार आहे. याविषयी तोरलला विचारले असता ती म्हणाली, कथानकाची गरज असल्यामुळे मी हा इंटीमेट सीन देणार आहे. मात्र एका मर्यादेपर्यंतच मी हा सीन शुट करणार आहे.

मालिकेत लिपलॉक करणार का ? या प्रश्नावर तोरलने नाही असे उत्तर दिले. ती म्हणाली की, मी यासाठी नकार दिला आहे. लिपलॉक सीन करण्यात मी कम्फर्टेबल नाहीये.

असो, आता मालिकेत लवकरच शिव आणि आनंदीचा रोमान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार हे नक्की.