आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women's Day: स्पेशल शोची होस्ट बनली विद्या, बघा शुटिंगचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा स्टार प्लस वाहिनीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'नो मोअर कमजोर' हा शो प्रसारित केला जाणार आहे. या शोच्या माध्यमातून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
समाजातील दबाव सहन करुन स्वबळावर आपले ध्येय गाठणा-या महिलांना 8 मार्च रोजी स्टार प्लस वाहिनीच्या वतीने सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या यशाच्या गाथांमधून इतर महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हा शो होस्ट करणार आहे. 3 मार्च रोजी मुंबईत या शोचे शुटिंग झाले. शोमध्ये विद्या अशा काही महिलांच्या यशाची गाथा सांगणार आहे, ज्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचे साहस दाखवले आहे.
लॉरेन गोटलिएब, सायंतनी घोष आणि शक्ति मोहन या कलाकारांच्या सादरीकरणाने शोला चारचाँद लागणार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा या शोच्या शुटिंगदरम्यान क्लिक झालेली काही खास छायाचित्रे...