आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Many Know That Current Anandi Of Balika Vadhu Is Married In Real Life.

हा आहे \'आनंदी\'चा रिअल लाइफ Husband, पाहा Personal photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्या लोकप्रिय सेलेब्सच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा असते. सेलेब्स खासगी आयुष्यात काय करतात, त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय कोण आहेत, ते काय करतात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सूक असतो. आज आम्ही तुम्हाला 'बालिका वधू' मालिकेत 'आनंदी'चे पात्र साकारून प्रसिध्द झालेल्या अभिनेत्री तोरल रास्पुत्रच्या पतीविषयी सांगणार आहोत.
वरील छायाचित्रात आनंदीसोबत दिसणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून आनंदीचा रिअल लाइफ पती आहे. हे छायाचित्र आनंदीच्या लग्नाचे आहे. ती खासगी आयुष्यात कशी राहते, हेसुध्दा आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहोत.
तोरल रास्पुत्र डिज्ने चॅनलवर आपल्या सुपरहिट 'धूम मचाओ धूम' शोसाठी ओळखली जाते. तिने इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात अमूल, शॉपर्स स्टॉपच्या जाहिरातीने केली होती. तिने 'रिश्तो की डोर' मालिकेमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. 'छोटी सी जिंदगी' मालिकेतसुध्दा तोरलने काम केले होते. तोरलचा जन्म गुजरातमध्ये झाला, मात्र तिचे कुटुंबीय नंतर मुंबईला शिफ्ट झाले. तिचे शिक्षणसुध्दा मुंबईमध्ये पूर्ण झाले.
2013पासून तोरल 'बालिका वधू' मालिकेत 'आनंदी'ची भूमिका साकारत आहे. तिला या मालिकेतून इतकी लोकप्रियता मिळाली, की तिला ख-या नावाऐवजी 'आनंदी' नावाने ओळखले जाते.
या पॅकेजमधून तुम्ही पाहू शकता तोरलच्या खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा...