आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Well Between Karan Singh Grover And Jennifer Winget Because Of Bipasha Basu

PICS : बिपाशा बसूमुळे टीव्ही इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध रिअल लाईफ कपलमध्ये निर्माण झाला दुरावा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोवर)
मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. बातमी आहे, की या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या असून यामागे कारण आहे करणचा 'क्रिएचर 3डी' हा डेब्यू सिनेमा. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमातील करणची को-स्टार बिपाशा बसूसोबत त्याच्या निर्माण झालेल्या जवळीकमुळे जेनिफर नाराज आहे.
सूत्रांनी सांगितले, "क्रिएचर 3डी या सिनेामाच्या शूटिंगदरम्यान करण आणि बिपाशाने बराच वेळ एकत्र घालवला. एवढेच नाही तर अनेकदा करणला बिपाशाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बघितले गेले आहे. बिपाशामुळे या पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला आहे."
काही दिवसांपूर्वी 'क्रिएचर 3डी' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये बिपाशाने करणची खूप स्तुती केली होती. तिने म्हटले होते, "करण आणि माझे कॉम्बिनेशन खूप चांगले जमले आहे. आमच्या चांगली मैत्रीसुद्धा झाली आहे. शूटिंगवेळी आम्ही दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. तो खूप मेहनती आणि चांगला अभिनेता आहे."
अद्याप याविषयी करण किंवा जेनिफरकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळालेली नाहीये.
कोण आहे करण सिंह ग्रोवर...
करण सिंह ग्रोवर टीव्ही अबिनेता आहे. झी टीव्ही वाहिनीवरील कुबूल है या मालिकेत तो असद अहमद खान हे मुख्य पात्र साकारतोय. याशिवाय 'कसौटी जिंदगी की' (स्टार प्लस, 2005-2006) आणि 'दिल मिल गए' (स्टार वन, 2008-2010) या मालिकांमध्ये तो झळकला आहे. आगामी 'क्रिएचर 3डी' या सिनेमाद्वारे करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.
कोण आहे जेनिफर विंगेट...
जेनिफर करण सिंह ग्रोवरची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्लस वाहिनीवरील 'सरस्वतीचंद्र' या मालिकेत कुमुदची भूमिका साकारत आहे. 'कसौटी जिंदगी की' (2004-2008), 'दिल मिल गए' (2008-2010) आणि 'क्या होगा निम्मो का'(2006-2007) या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 2012 मध्ये जेनिफरने 'दिल मिल गए' या मालिकेतील तिचा को-स्टार करण सिंह ग्रोवरसह लग्न केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटची खास छायाचित्रे...