आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 6 : यंदाच्या पर्वात शिवीगाळ, मारहाण नाही, फक्त मनोरंजनाची हमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्मॉल स्क्रिनवर चर्चेत राहणारा 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोचे सहावे पर्व नव्या अवतारात लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बिग बॉस'चे सहावे पर्व कुटुंब एकत्र बसून बघू शकणार आहे. यंदाच्या पर्वात मनोरंजनाची हमी देण्यात आली आहे.
'बिग बॉस' हा कार्यक्रम आजवर अश्लिलता, शिवीगाळ, मारहाण यासगळ्यामुळे चर्चेत होता. शिवाय पोर्न स्टार सनी लियोन, सीमा परिहार, आयटम गर्ल्स संभावना सेठ, राखी सावंत, पत्नी श्वेता तिवारीला मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेला राजा चौधरी, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक या वादग्रस्त व्यक्तींच्या सहभागामुळेही हा कार्यक्रम वादात सापडला होता.
आता बातमी आहे की, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खानने यंदाच्या पर्वात अश्लिलता राहणारा नाही, याची काळजी घेण्याचे निर्मात्यांना सांगितले. शिवाय हा कार्यक्रम फॅमिली शोच्या रुपात सादर करण्याची विनंतीही केली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने निर्माता आणि शोचे प्रसारणकर्ता यांची भेट घेऊन शोची निगेटिव्ह इमेजला बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
'पुन्हा 'बिग बॉस'सारख्या पागलखान्यात मी जाणार नाही'
'बिग बॉस'नंतर कधीच भारतात परतायचे नव्हते सनीला
‘अटकेचे दु:ख नाही, आनंद बिग बींना पाहिल्याचा’