आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसह कपिल शर्माची ऑनस्क्रिन पत्नी, पाहा इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले ऑफस्क्रिन लाइफचे Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसह सुमोना चक्रवर्ती
मुंबई: अलीकडेच, 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोने 100 एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. शोच्या सर्व टीमने या निमित्तावर एका पार्टीचे आयोजन करून पुष्कळ एन्जॉय केला. या पार्टीची छायाचित्रे सुमोना सध्या इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. तसे पाहता सुमोना सोशल साइट्सवर नेहमी एक्टिव्ह असते. पार्टी असो अथवा पर्सनल लाइफ प्रत्येक क्षणाचा एन्जॉय शेअर करायला तिला आवडते. 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये सुमोना बिट्टू शर्माची (कपिल शर्मा) पत्नी मंजूचे पात्र साकारत आहे. जाणून घेऊया सुमोनाच्या रिअल लाइफविषयी...
उत्तरप्रदेशमधून शिक्षण केले पूर्ण

मुंबईमध्ये राहणा-या सुमोनाने लोरेटो कान्वेंट स्कुल, लखनऊ उत्तर प्रदेश आणि हीरानंदानी फाउंडेशन स्कुल, मुंबई येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबईच्या जय हिंद कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या सुमोनाच्या कुटुंबात आई-वडिलांव्यतिरिक्त एक धाकटा भाऊसुध्दा आहे. तिचे वडील श्रीलंकेमध्ये कार्यरत आहेत. 1997पासून तिचे कुटुंबीय मुंबईमध्ये राहत आहे.

आमिर खानसोबत केले आहे काम


कदाचितच कुणाला माहित असेल, की सुमोना चक्रवर्तीने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानसोबतसुध्दा काम केले आहे. तिने 1999मध्ये आलेल्या अनिल कपूर आणि मनीषा कोयराला अभिनीत 'मन' सिनेमात एक बालकलाकार म्हणून काम केले आहे. त्यावेळी तिचे वय केवळ 12 वर्षे असून ती 6वीच्या वर्गात शिकत होती.

अनेक मालिकांमध्ये केला आहे अभिनय

सध्या 'कॉमेडी नाइट्स...'मध्ये कपिलची ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणा-या सुमोनाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. दूरदर्शनच्या 'कब क्यो कैसे'(2009), झी टीव्हीच्या 'कसम से' (2006-2009), बिनधास्त चॅनलच्या 'सुन यार चिल मार'(2007), स्टार प्लस चॅनलच्या 'कस्तूरी'(2007-2009), आणि सोनी एंटरटेनमेन्ट चॅनलवरील 'बडे अच्छे लगते है' (2011)सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने दमदार अभिनय करून आपली ओळख निर्माण केली आहे. सुमोना अभिनयासोबतच मॉडेलिंगसाठीसुध्दा ओळखली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुमोनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली खास छायाचित्रे...