आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'महाभारता\'च्या सेटवर शकुनि- दु:शासन घेतायेत डुलक्या, बघा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी 'महाभारत' ही मालिका लोकप्रिय असलेल्या मालिकांमध्ये सामील होत आहे. दमदार अभिनयाने यातील कलाकार लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहेत. अलीकडेच द्रौपदीचे पात्र साकारणा-या पूजा शर्माची सध्या बरीच प्रशंसा केली जात आहे.
केवळ पूजा शर्माच नव्हे तर, महाभारत मालिकेत काम करण्या-या प्रत्येक पात्र लोकांच्या पसंतीस पडत आहेत. या मालिकेत कृष्णाचे पात्र सौरभ राज जैन साकारत असून अर्जुनची भूमिका शाहीर शेख वठवत आहे. रोहित भारव्दाज युधिष्ठर, सौरव गुर्जर भीम, अर्पता रंका दुर्योधन, पुनीत भट्ट शकुनि मामा, अरव चौधर पितामह भीष्म, अनूप सिंह ठाकूर धृतराष्ट्र, शफक नाज कुंती आणि अहम शर्मा कर्ण असे हे सर्व कलाकार आपल्याला विविध पात्रात दिसत आहेत.
या कलाकारांना आपण छोट्या पडद्यावर नेहमीच बघत असतो. सर्वजण आपल्या पात्राला चांगल्याप्रकारे साकारत आहेत. ऐतिहासिक पात्र पडद्यावर जिंवत करणे या कलाकारांना किती मेहनत घ्यावी लागते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. पण सेटवर शुटिंग करतेवेळी एन्जॉय करण्याची एकसुध्दा संधी हे स्टार्स सोडत नाहीत.
पडद्यावर जरी दुर्योधन अर्जुनचा शत्रु असला आणि शकुनि पांडवांच्या विरुध्द असला तरी ऑफस्क्रिन हे सर्व स्टार्स मस्ती करण्यात माहे नाहीत हे मात्र नक्की. सेटवर त्यांच्यामधीत खरी बाँडिंग बघायला मिळते.
आपल्या पात्रांना पडद्यावर जिवंत दाखवण्यासाठी हे स्टार्स 17-18 तास कड़क मेहनत घेत असतात. त्यामुळे त्यांना कधी-कधी सुर्चीवर बसूनच झोप घ्यावी लागते. हे दृश्य तुम्ही वरील छायाचित्रात बघू शकता. त्या छायाचित्रात शकुनि आणि दु:शासन झोपेच्या डुलक्या घेत आहेत.
divyamarathi.com आज तुम्हाला महाभारत या मालिकेच्या सेटवरील काही गंमतीशीर सीन दाखवणार आहे. जे बघून तुमच्या चेह-यावर नक्कीच हसू फुटेल...