आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटा 'चिडियाघर'च्या मयुरीला, पाहा तिचे ऑफ स्क्रिन आयुष्यातील 24 PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो : देबिना बॅनर्जी]
मुंबई - 'चिडियाघर' ही मालिका सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील सर्व पात्रांपैकी मयुरी हे पात्र प्रेक्षकांच्या जास्त पसंतीला पडले आहे. मयुरी हे पात्र साकारत आहे अभिनेत्री देबिना मुखर्जी. 20 सप्टेंबर 1980 रोजी कोलकातामध्ये जन्मलेली देबिना अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 'चिडियाघर' या मालिकेत मयुरीच्या भूमिके झळकत असलेली देबिना याच नावाने प्रसिद्ध झाली आहे. जाणून घ्या देबिनाविषयी बरंच काही...
तामिळमध्ये मिळाला होती पहिली संधी
देबिनाने आपल्या करिअरची सुरुवात तामिळ मालिकेतून केली होती. 2005 मध्ये आलेल्या या मालिकेचे नाव 'मायाबी' होते. तेव्हापासून ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. 2008मध्ये एनडीटीव्ही इमॅजिन वाहिनीवर प्रसारित होणा-या 'रामायण' या मालिकेत देबीनाने साकारलेली सीतेची भूमिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. त्यानंतर ती 'पती, पत्नी और वो', 'जोर का झटका', 'स्टार या रॉकस्टार', 'वेलकम : बाजी मेहमाननवाजी की', 'नच बलिए 6' आणि 'खतरों के खिलाडी 7' या रिअॅलिटी शोमध्ये झळकली.
'रामायण' मालिकेदरम्यान झाली गुरमीतशी भेट...
'रामायण' या मालिकेत सीतेची भूमिका साकारणा-या देबीनाची भेट याच मालिकेच्या सेटवर अभिनेता गुरमीत चौधरीसोबत झाली. गुरमीत या मालिकेत रामाच्या भूमिकेत होते. रील लाईफमध्ये पती-पत्नीच्या भूमिकेत झळकणारे हे स्टार्स खासगी आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये हे गुरमीत आणि देबिना लग्नगाठीत अडकले.
सिनेमांमध्येही केले आहे काम...
देबिनाने केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावले आहे. 2003 मध्ये लॉरेन्स डिसुजा दिग्दर्शित 'इंडियन बाबू' या सिनेमात देबिनाने गुरलीन चोप्राच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती. याशिवाय तेलगु आणि तामिळमध्येही तिने एक-एक सिनेमा केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा देबिनाची ऑफ स्क्रिन आयुष्यातील 23 छायाचित्रे...
(नोट : ही सर्व छायाचित्रे इंटरनेटवरुन घेण्यात आली आहेत...)