आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG: Pratyusha Banerjee Spotted Wearing Sindoor On Her Birthday Bash!

खरंच झाले का 'आनंदी'चे लग्न, बर्थडे पार्टीत भांगात दिसले कुंकू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीत बॉयफ्रेंड राहुल राजसोबत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
पार्टीत बॉयफ्रेंड राहुल राजसोबत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी

मुंबईः 'बालिका वधू' या टीव्ही मालिकेत आनंदीच्या भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने वयाची 24 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 ऑगस्ट 1991 रोजी जमशेदपूर येथे जन्मलेल्या प्रत्युषाने वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून प्रत्युषा तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या पार्टीत प्रत्युषा भांगात कुंकू लावून दिसली. तिच्या भांगातले कुंकू बघता तिने खरंच बॉयफ्रेंडसोबत लग्न थाटले की काय असा प्रश्न उपस्थित झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्युषा सध्या 'माता की चौकी' फेम अभिनेता राहुल राजसोबत रिलेशनशिपमध्ये असून लग्नाचे प्लानिंग करत आहे. मात्र या दोघांनी लग्न केले की नाही याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
पार्टीत प्रत्युषा आणि राहुल राजने पाहुण्यांसोबत भरपूर धमाल मस्ती केली. यावेळी प्रत्युषाचा ऑन स्क्रिन नवरा शशांक व्याससह अभिनेता अनुप सोनी, एलन कपूर, स्मिता बन्स हे कलाकार उपस्थित होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, प्रत्युषा बॅनर्जीच्या बर्थडे पार्टीची छायाचित्रे...