आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: 'डीआयडी सुपर मॉम्स'च्या ग्रॅण्ड फिनालेत गोविंदासोबत थिरकली करिश्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डीआयडीच्या फिनालेत परफॉर्मन्स देताना गोविंदा आणि करिश्मा कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर 'डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स'च्या ग्रॅण्ड फिनालेत एकत्र ठुमके लावताना दिसणार आहेत. 'राजा बाबू', 'कुली नंबर वन' आणि 'हीरो नंबर वन' सह 11 सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेल्या या सुपरहिट जोडीला पुन्हा एकदा डान्स फ्लोअरवर बघणे नक्कीच रंजक ठरणारेय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रॅण्ड फिनालेत गोविंदा आणि करिश्माने 'व्हाट्स योर मोबाइल नबंर', 'मैं तो रस्ते से जा रहा था', 'हुस्न है सुहाना', 'सरकाई लो खटिया' आणि 'गोरिया चुरा न मेरा जिया' या गाण्यांवर ताल धरुन ऑडिअन्सला एन्टरटेन केले.
झी टीव्हीवर टेलिकास्ट होणारा डान्स बेस्ड शो गोविंदा, कोरिओग्राफर टेरेन्स लुईस आणि गीता कपूर मिळून जज करत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'डीआयडी सुपर मॉम्स'च्या फिनाले एपिसोडमध्ये क्लिक झालेली गोविंदा आणि करिश्माची खास छायाचित्रे...