अलीकडेच 'एक था राजा एक थी रानी' या टीव्ही मालिकेच्या सेटवरसुध्दा मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन झाले. सेटवर पतंगबाजीचा सीक्वेन्स चित्रीत करण्यात आला. त्यामध्ये गायत्री देवी आणि राणा इंद्रवर्धन सिंह देवसोबत पतंग उडवताना दिसली. परंतु यादरम्यान दोघांमध्ये असे काही बोलणे झाले, की राणाजी गायत्रीला सोडून निघून गेले.
या मालिकेत राजमाता प्रियमवदाची भूमिका साकारणा-या अनिता राज स्वत: पंजाबी असून संक्रातीसोबतच लोहडीसुध्दा सेलिब्रेट करतात. झी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'एक था राजा एक थी रानी' मालिकेत दृष्टी धामी आणि सिध्दार्थ कार्निक मुख्य भूमिका साकारत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सेलिब्रेशनचे काही फोटो... तिस-या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...