आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Location : Sara Khan Makes Entry In ‘Bhagyalaxmi’

टीव्हीवर अशा अंदाजात होणार साराचे कमबॅक, नकारात्मक भूमिकेत झळकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(On Location: शोची अभिनेत्री अरुणा ईराणीच्या कानशिलात लगावताना सारा खान)
मुंबई- 2007पासून 2010मध्ये लोकप्रिय झालेल्या 'सपना बाबुल का...बिदाई' (स्टार प्लस) मालिकेतून प्रसिध्द झालेली सारा खान टीव्हीवर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. यावेळी ती नकारात्मक भूमिका दिसणार आहे. अँड टीव्हीच्या 'भाग्यलक्ष्मी' मालिकेत ती कॅबरे डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती मालिकेत भोजपूरी स्टार होण्याचे स्वप्न उराशी बाळगते.
Divyamarathi.comसोबत बातचीत करताना साराने आपल्या भूमिकेविषयी सांगितले.
साराने सांगितले, 'मालिकेत मी संघर्ष करणारी भोजपूरी अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. ती एका कुटुंबाचा सूड उगवण्यासाठी येते. शोसाठी ही भूमिका महत्वाची आहे. माझ्या एंट्रीनंतर अनेक ड्रामा होणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, की प्रेक्षक याला एन्जॉय करतील.'
साराचे म्हणणे आहे, की शोमध्ये तिची एंट्री धमाकेदार असेल. ती पुढे सांगते, 'माझी एंट्री डान्स परफॉर्मन्सने होणार आहे. याविषयी मी खूप उत्सूक आहे. मला डान्स करायला आवडते आणि मी म्हणू शकते, की ही माझी सुरुवात आहे.' साराची एंट्री शोमध्ये काय नवीन टि्वस्ट आणते पाहणे औत्सूकत्याचे ठरेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहू शकता, की साराच्या एंट्रीचे On Location Photos...