आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Operation Salvage Grover’S Show Goes For A Revamp

\'मॅड इन इंडिया\'चा पहिला एपिसोड ठरला फ्लॉप, जाणून घ्या आता काय करणार \'चुटकी\'?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल कपिलच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या शोमधील
प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे पाहूणे आणि कलाकार उपस्थिती लावत असतात. शोमधील विविध पात्र प्रेक्षकांचे आणि आलेल्या पाहूण्यांचे मनभरून मनोरंजन करतात. परंतु या सर्व पात्रांमध्ये 'गुत्थी' नावाचे पात्र सर्वाधिक चर्चेतील आणि
कॉमेडी होते.
'गुत्थी'ने तिच्या अनोख्या अंदाजामुळे आणि स्टाइलने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सुनील ग्रोवर ही भूमिका साकारत होता. सुनीलने ही भूमिका उत्कृष्ठरित्या साकारली होती. या शोमधूनच सुनील प्रसिध्दी झोतात आला.
परंतु काही कारणास्तव सुनीलने हा शो सोडला आणि स्वत:चा 'मॅड इन इंडिया' हा कॉमेडी शो मागील रविवारी स्टार प्लस या चॅनलवर प्रसारित केला. या शोमध्ये 'गुत्थी'च्या पात्राचे नवीन नामकरण झाले आहे. 'गुत्थी'ऐवजी 'चुटकी' या नावाची भूमिका साकारून सुनील लोकांचे मनोरंजन करत आहे.
'मॅड इन इंडिया' शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बाबा रामदेव पाहूणे म्हणून आले होते. परंतु लोकांना बाबा रामदेव यांना नव्हे 'चुटकी'ला बघण्याची उत्सूकता जास्त होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा यू-ट्यूबवर सुनीलच्या व्हिडिओखाली काय-काय प्रतिक्रिया आल्या...?