आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी नाइट्स...\' फेम ‘पलक’ला अटक, बाबा राम रहीमची खिल्ली उडवल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉमेडिअन किकू शारदाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कॅथलला आणण्यात आले. - Divya Marathi
कॉमेडिअन किकू शारदाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कॅथलला आणण्यात आले.
कॅथल (हरियाणा)- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी टीव्ही शोमध्ये 'पलक'ची भूमिका साकारणा-या किकू शारदाला कॅथल पोलिसांनी मुंबईहून अटक केली आहे. आरोप आहे, की त्याने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या 'एमएसजी 2'च्या एका सीनवर कॉमेडी अॅक्ट सादर केला होता. त्याच्यासह इतर नऊ लोकांवर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप लावून तक्रार दाखल करण्यात आली आहे. किकूला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
कोणत्या सीनवर घेतला आक्षेप...
- डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांचा आरोप आहे की जश्न-ए-आझादीच्या कॉमेडी शोमध्ये 'एमएसजी-टू' च्या एका सीनचे विद्रूपीकरण करण्यात आले.
- त्यात गुरमीत रामरहीम यांच्या गेटअपमध्ये कलाकार दारूचा प्याला भरतात आणि तरुणींसोबत अश्लील डान्स करतात.
- हा एपिसोड 27 डिसेंबरला टेलिकास्ट करण्यात आला होता.
कोणावर गुन्हा दाखल
- कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी), राजीव ठाकूर, पुजा बॅनर्जी, मुन्ना राय, गौतम गुलाटी आणि सना खानसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 'कॉमेडी नाइट विथ कपील'मध्ये कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी) च्या भूमिकेत असतो.
- यामध्ये किकू शारदाला कॅथल पोलिसांनी अटक वॉरंटवर ताब्यात घेतले आहे.
- किकूला पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबईहून कॅथलला घेऊन गेले. येथे त्याची चौकशी केली जात आहे.
- चौकशीपूर्वी किकूने माध्यमांना सांगितले, 'आम्ही कलाकार आहोत. आमचे काम हसवणे आहे. आमचा हेतू कुणाच्या धार्मिक भावना दुखावणे नाहीये. जर कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर हात जोडून माफी मागतो.'
कोण आहे तक्रारदार
- डेरा समर्थक उदयसिंह यांनी शुक्रवारी रात्री या कलाकारांविरुद्ध कैथल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा किकू शारदाला अट केल्यानंतरचे फोटो आणि डेरा समर्थकांचा रास्तारोको...