आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कॉमेडी नाइट्स...\'च्या \'पलक\'ला राम रहीमने केले माफ, पुन्हा घेतले ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या टीव्ही शोमध्ये 'पलक'ची भूमिका साकारणा-या किकु शारदाला पोलिसांनी मुंबईमध्ये अटक केली होती. किकुला पोलिसांनी कॅथल कोर्टमध्ये हजर केले, तिथून त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. मात्र नंतर त्याने 1 लाखांत जामिन मंजूर झाला.
का पुन्हा ताब्यात घेण्यात आले?
जामिनानंतर किकुला आणखी एका प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. एएनआयनुसार, किकुला फतेहाबादला नेण्यात आले. वादग्रस्त टीव्ही शोबाबत येथेसुध्दा एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती. सुत्रांच्या सांगण्यानुसार, सकाळपर्यंत हे प्रकरण सोडवले जाईल. हरियाणा सरकारनेसुध्दा कन्फर्म केले आहे, की किकुला काही फॉर्मेलिटीजसाठी फतेहाबादला नेण्यात आले आहे.
किकुने सांगितले, 'माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागतो.'
दुसरीकडे, गुरमीत राम रहीमने टि्वट केले, 'जर त्याने (किकुने) माफी मागितली आहे तर माझ्याकडून काहीच तक्रार नाहीये.'
किकुवर लावण्यात आलेले आरोप...
- डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांचा आरोप आहे की जश्न-ए-आझादीच्या कॉमेडी शोमध्ये 'एमएसजी-टू' च्या एका सीनचे विद्रूपीकरण करण्यात आले.
- त्यात गुरमीत रामरहीम यांच्या गेटअपमध्ये कलाकार दारूचा प्याला भरतात आणि तरुणींसोबत अश्लील डान्स करतात.
- हा एपिसोड 27 डिसेंबरला टेलिकास्ट करण्यात आला होता.
- - कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी), राजीव ठाकूर, पुजा बॅनर्जी, मुन्ना राय, गौतम गुलाटी आणि सना खानसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 'कॉमेडी नाइट विथ कपील'मध्ये कीकू शारदा (पलक), सुनील ग्रोवर (गुत्थी), असगर अली (दादी) च्या भूमिकेत असतो.
काय म्हणाला कपिल शर्मा...
- कपिल शर्माने टि्वट केले, 'माझी संत गुरमीत राम रहीमला एक विनंती आहे, की या प्रकरणाबाबत माध्यमांसमोर यावे. एक कलाकार जो जगात आनंद वाटण्याचे काम करत आहे, त्याच्या समोर उभे राहून संपूर्ण जगाला माणूसकीचे एक उदाहरण द्यावे.'
- अभिनेता वीर दासने टि्वट केले, 'कॉमेडी कधीच कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाही. जर तुम्ही विनोदाला गांभीर्याने घेतले तर तुम्ही कधीच विनोद समजू शकत नाहीत.'
- राजू श्रीवास्तवने सांगितले, 'मी लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींसारख्या अनेक नेत्यांची नकल केली. परंतु मला कधीच विरोधाचा सामना करावा लागला नाही.'
- कॉमेडिअन तन्मय भटने टि्वट केले, 'हे खूपच दु:खद आहे. कलम 295मध्ये बदल करणे गरजेचे आहे.'
कोण आहे तक्रारदार
- डेरा समर्थक उदयसिंह यांनी शुक्रवारी रात्री या कलाकारांविरुद्ध कैथल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राम रहीमचे टि्वट आणि इतर फोटो...