आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याच्या पलीकडे पाहायला लावणारा 'पंचनामा'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत असताना नागरिकांमध्ये ह्या बाबतीत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्टार प्रवाह या वाहिनीवर 'पंचनामा' हा नवा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रात घडत असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवाय गुन्हेगारांची मानसिकताही जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर. ब-याच दिवसांनी महेश मांजरेकर छोट्या पडद्याकडे वळले आहेत.
या कार्यक्रमाविषयी महेश मांजरेकर म्हणाले की, ''पंचनामा हा अतिशय वेगळा कार्यक्रम असून तो गुन्हेगारीच्या विश्वात खोल डोकावतो आणि गुन्हेगारांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दर्शक आमच्या प्रयत्नांचे कौतूक करतील आणि त्यांना हा शो आवडेल.''
१७ ऑगस्टपासून 'पंचनामा' हा कार्यक्रम आपल्या भेटीला येत असून दर शुक्रवार आणि शनिवारी रात्री साडे नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
PICS : करणच्या सिनेमात महेश भट्टच्या मुलीचा जलवा
महेश मांजरेकर यांचे 'कुटुंब' मोठ्या पडद्यावर
महेश मांजरेकरसोबत ‘नटसम्राट’ साकारण्यास अमिताभ बच्चन तयार
महेश भट्ट यांची सनी लियोनवर कडक नजर