आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaj Dheer Reveals The Preparations Of The Wedding Of His Son

टीव्हीच्या \'राणी लक्ष्मीबाई\'सह लग्न करतोय \'थंगाबली\', जाणून घ्या कुठवर आली आहे लग्नाची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फाइल फोटो: कृतिका सेंगर आणि निकितन धीर)
मुंबई: ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित 'झांसी की रानी' या मालिकेत मुख्य भूमिका (राणी लक्ष्मीबाई) साकारणारी अभिनेत्री कृतिका सेंगर लग्नगाठीत अडकण्याच्या तयारीत आहे. तिचे लग्न टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते पंकज धीर यांचा मुलगा आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील थंगाबलीचे पात्र साकारणा-या निकितन धीरसोबत होत आहे. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.
निकितनच्या लग्नाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी DivyaMarathi.Comने त्याचे वडील पंकज धीर यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितले, 'कृतिका आणि निकितन यांच्या लग्नाने मी आनंदी आहे. कृतिका खूप चांगली मुलगी आहे. ती माझ्या मुलीप्रमाणे आहे. 'झासी की राणी' मालिकेत पाहिल्यानंतर मी तिचा मोठा चाहता झालो आहे. आता विश्वास बसत नाहीये तीच झाशीची राणी माझ्या घरची सून होत आहे. निकितन नशीबवान आहे, की त्याला कृतिकासारखी मुलगी भेटली.'
लग्नाची तयारी कुठवर आली, याविषयी पंकज यांनी सांगितले, की त्याबाबत अद्याप खुलासा करू इच्छित नाही. ते म्हणाले, 'मी लग्नाच्या तयारीविषयी सांगू शकत नाही. परंतु इतर लग्न समारंभाप्रमाणे सर्व तयारी असेल. मला हे लग्न धूमधडाक्यात करायचे आहे. त्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्स कृतिका आणि निकितनला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी येतील. त्याची तयारी सुरु झाली आहे.'
लग्नाच्या योजनेविषयी आणखी जाणून घेण्यासाठी आम्ही निकितनशी संपर्क साधला. त्याने सांगितले, 'आमच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. आम्ही खूप उत्साही आहोत. रोज प्लानिंगमध्ये नवीन बदल करत आहोत. संगीत सेरेमनीची रिहर्सल सुरु झाली आहे. हा कौटुंबीक समारंभ असल्याने याविषयी जास्त काही सांगू शकत नाही. मी आणि कृतिका खूप आनंदी आहोत आणि तयारीत व्यस्त आहोत.'
कृतिका आणि निकितन यांचे 3 सप्टेंबर रोजी लग्न होणार आहे. एक दिवसापूर्वी अर्थातच 2 सप्टेंबरला त्यांच्या संगीत सेरेमनीचा कार्यक्रम होणार आहे.
कोण आहे निकितन?
निकितन धीर एक बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात थंगाबलीचे पात्र साकारले होते. शिवाय, त्याने 'खतरों के खिलाडी' या टीव्ही शोच्या पाचव्या पर्वात सहभाग घेतला होता. 'जोधा अकबर' (2008), 'मिशन इस्तांबुल' (2008), 'रेडी' (2011), आणि 'दबंग 2' (2012) सारख्या बॉलिवूड सिनेमांतसुध्दा त्याने अभिनय केला आहे. निकितन टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द चेहरा पंकज धीर यांचा मुलगा आहे. 1994-1996मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणा-या 'चंद्रकांता' या मालिकेत शिवदत्तच्या रुपात लोकप्रिय झाले होते.
कोण आहे कृतिका?
कृतिका एक टीव्ही अभिनेत्री असून तिने 2010-2011मध्ये झीटीव्हीवर प्रसारित होणा-या 'झांसी की राणी' मालिकेत लक्ष्मीबाईचे पात्र साकारले होते. या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. शिवाय, 'कसौटी जिंदगी की' (2007-2008) आणि 'पुनर्विवाह' (2012-2013) सारख्या मालिकेतसुध्दा तिने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कृतिका आणि निकितन यांची छायाचित्रे...